लैंगिक छळ पीडित पुरुषांनाही मिळणार नुकसानभरपाई

supreme-court-1

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

लैंगिक छळ हा फक्त महिलेचाच होतो हा समज खोडून काढणाऱ्या अनेक घटना आपल्या देशात घडल्या आहेत. बलात्काराचा किंवा लैंगिक छळाचा सामना ज्या पुरुषांना करावा लागला आहे अशा पुरुषांसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की यापुढे पीडित पुरुषांनाही सरकारकडून नुकसानभरपाई मिळेल. अॅसिड हल्ला झालेल्या पुरुषांनाही ही नुकसानभरपाई मिळणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पोक्सो कायद्याबाबत होत असलेल्या सुनावणीदरम्यान पिडीत पुरुषांनाही नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने स्वीकारत त्यांनाही नुकसानभरपाई मिळण्याचा अधिकार आहे असं स्पष्टपणे सांगितलं.