शबाना आझमींनी केले मोदींचे अभिनंदन,नेटकऱ्यांनी विचारले ‘देश कधी सोडणार?’


सामना ऑनलाईन । मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करणाऱ्या शबाना आझमी यांनी लोकसभेच्या निकालानंतर मोदींचे अभिनंदन केले आहे. शबाना यांनी ट्विटरवरून मोदींना व एनडीएला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी त्यांना देश कधी सोडून जाणार असा प्रश्न केला आहे.

काही दिवसांपूर्वी शबाना आझमी यांनी मोदी पुन्हा सत्तेत आले तर देश सोडून जाईन असे वक्तव्य केल्याची चर्चा रंगली होती. मात्र नंतर शबाना आझमी यांनी आपण अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचा दावा केला होता.