मोहम्मज पैगंबरांच्या वंशजांची इसिसविरोधात लढाई

सामना ऑनलाईन, अम्मान

इस्लामला बदनाम करणाऱ्या इसिस सारख्या दहशतवादी संघटनांच्या विरोधात मोहम्मह पैगंबरांचे वंशज शाह अब्दुल्ला यांनी लढाई सुरू केली आहे. अब्दुल्ला यांचे कुटुंब मुस्लमानांसाठी अत्यंत श्रद्धेचा विषय आहे. आधुनिकतेची कास धरलेल्या या कुटुंबाने धर्मातील चुकीच्या प्रथांना तिलांजली दिली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर बुर्ख्याचं देऊ शकतो. अब्दुल्ला यांच्या कुटुंबातील महिला बुर्खा वापरत नाहीत, त्या पाश्चात्य संसकृतीचे कपडे परीधान करत असून अब्दुल्ला कुटुंबाचा एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

शाह अब्दुल्ला यांचं संपूर्ण शिक्षण विदेशात झालं आहे आणि त्यांची पत्नी हे अमेरिकेची रहिवासी आहे. हार्ले डेव्हीडसन चालवणाऱ्या शाह अब्दुल्ला यांनी कट्टरपंथी मुसलमानांना त्यांच्या राहणीमानातून संदेश दिला आहे की काळाप्रमाणे बदललं पाहीजे आणि जुनाट विचार सोडून दिले पाहीजेत. शाह अब्दुल्ला यांनी इस्लामी संस्कृतीच्या नावाखाली सुरू केलेल्या दहशतवादी कारवायांना कडाडून विरोध केला आहे. जॉर्डनने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे, सोबतच इसिसविरोधात लढणाऱ्या राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावत जॉर्डनने दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले केले आहेत. अब्दुल्ला यांनी संयुक्त राष्ट्राच्या मंचावरून इसिसविरोधात एकजूट होण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनानंतर अमेरिका आणि रशियाच्या नेतृत्वात दोन वेगवेगळ्या लष्करी तुकड्या इसिसचा मुकाबला करीत आहेत.