शाहीद आफ्रिदीसारखे मुस्लिम मूर्ख आणि मागास; माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू

81

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्या निशाण्यावर आला आहे. माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी शाहीद आफ्रिदीवर हल्ला चढवत त्याला मूर्ख आणि मागास असे म्हटले आहे. काटजू यांनी फेसबुक पोस्टद्वारे आफ्रिदीवर टीकेची झोड उठवली आहे.

शाहीद आफ्रिदीसारखे मुसलमान जे आपल्या मुलीला बाहेर जाऊन (आऊटडोअर) खेळण्याची परवानगी देत नाहीत ते मूर्ख, मागास आणि प्रतिक्रियावादी आहेत असे मार्कंडेय काटजू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच या पोस्टवर वात्रटपणा आणि अभद्र टिप्पणी करणार्‍याला तत्काळ ब्लॉक करण्यात येईल. त्यामुळे काही लिहिण्यापूर्वी काळजी घ्या असा इशाराही त्यांनी दिला. काटजू यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, मार्कंडेय काटजू यांनी यापूर्वी अनेकदा आपल्या विधानांद्वारे प्रसिद्धी मिळवली आहे. एकदा त्यांनी आंतरजातीय विवाहाबाबत सल्ला मागितला होता आणि तोदेखील एका अशा जोडप्याकडून जे भिन्न धर्माचे आहेत आणि त्यांना घरच्यांचा विरोध आहे. यानंतर एका सरकारी रुग्णालयात काम करणार्‍या भिन्न धर्माच्या जोडप्याने त्यांचा सल्ला मागितला होता. मुलीच्या आईवडिलांना तिने त्या मुलासोबत लग्न केल्यास आमची बदनामी होईल असे म्हटले होते. यानंतर काटजू यांनी त्या जोडप्याला विद्रोह करण्याचा सल्ला दिला होता आणि जातीव्यवस्था समाजाला शाप असल्याचे म्हटले होते.

नक्की काय आहे प्रकार?

शाहीद आफ्रिदीने यापूर्वी मी माझ्या मुलींना बाहेर खेळण्यास जाऊ देत नाही असे म्हटले होते. सामाजिक आणि धार्मिक कारणामुळे चारही मुली (अंशा, अजवा, असमारा आणि अक्सा) यांना बाहेर जाऊन खेळण्यास मनाई करतो असे त्याने आपल्या गेमचेंजर या पुस्तकामध्ये नमूद केले. त्याच्या या खुलाशावर अनेकांनी टीका केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या