शाहिद आफ्रिदी गौतम गंभीर विरोधात पुन्हा बरळला

84

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे दिल्लीतील नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीर विरोधात शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. शनिवारी पाकिस्तानमध्ये एका पत्रकार परिषदेत आफ्रिदीने “गौतम गंभीरला अक्कल नसून तो मूर्ख आहे” असे म्हणून संबोधले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली होती. अनेक क्रिकेटपटूंप्रमाणे गौतम गंभीर यांनी देखील पाकिस्तानसोब विश्वचषकात खेळू नये अशी भूमिका मांडली होती. यानंतर शाहिद आफ्रिदीने “गंभीरकडे व्यक्तिमत्व नाही. तो खूप अहंकारी आहे, अशी टीका त्याच्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रात केली होती. आफ्रिदीच्या टीकेला गंभीरने देखील सडेतोड उत्तर दिले होते. मात्र आता पुन्हा आफ्रिदीने गंभीर विरोधात खालच्या पातळीवर टीका केली आहे. “गौतम गंभीरच्या बोलण्यावरून कळते की त्याला काही अक्कल नाही, तो मूर्ख आहे. कोणत्याही सुशिक्षित समाजातील लोकं अशी वक्तव्य करत नाहीत.” तसेच लोकसभा निवडणुकीत गंभीर विजयी झाल्याबाबत विचारले असता, “त्या लोकांनी (हिंदुस्थानातील जनतेने) अशा व्याक्तीला निवडून दिले आहे ज्याला काही अक्कलच नाही” असे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यातील  वाकयुद्ध अधिकच भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या