शाहीद-मीराच्या मुलाचं झालं बारसं, वाचा काय आहे ‘जैन’ नावाचा अर्थ


सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांना बुधवारी सायंकाळी पुत्र प्राप्ती झाली आहे. हे त्यांचे दुसरे मुल असून याआधी त्यांना मीशा ही दोन वर्षांची मुलगी आहे. दोन दिवसांच्या या बाळाचं बारसं झालं असून शाहीद आणि मीराने आपल्या या राजकुमाराचे नाव ‘जैन’ असे ठेवले आहे.

मुलाच्या नावाची माहिती शाहीद करूरने ट्वीट करून दिली आहे. ‘जैन कपूरच्या आगमनानंतर मी स्वत:ला परिपूर्ण झाल्याचे समजत आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी धन्यवाद. आम्ही खूप आनंदी आहोत’, असे शाहीदने ट्विटरवर म्हटले आहे.

‘जैन’ नावाचा अर्थ
जैन हा अरबी आणि हिब्रू भाषेतील शब्द असून याचा अर्थ होतो ‘सुंदर’. हिंब्रू भाषेतील सातव्या नंबरच्या अल्फाबेटला जैन असे म्हटले जाते. हे नाव 2001 मध्ये सर्वात पहिल्यांदा अमेरिकन मेल नेमिंग चार्टमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. शाहीदने आपल्या मुलीचे देखील अनोखे नाव ठेवले आहे. दोन वर्षाच्या मीशाचे नाव मीरा आणि शाहीद या नावांमधील पहिल्या शब्दांना एकत्र करून ठेवण्यात आले आहे.