वेश्यांना कंटाळून शाहीदने बदलले घर

 

सामना ऑनलाईन । मुंबई 

अभिनेता शाहीद कपूर याच्या जुहूच्या बंगल्यासमोरच्या रस्त्यावर दररोज रात्री वेश्याव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. दररोज रात्री वेश्या त्या फुटपाथवर त्यांच्या ग्राहकांची वाट पाहत उभ्या असतात. त्यामुळे शाहीदला अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच आता शाहीदने वरळीत नवीन घर घेतले आहे. नव्या घरासाठी त्याने तब्बल ५६ कोटी रुपये मोजले आहे. शाहीदने नुकतीच या घरासाठी अडीच कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

शाहीदने वरळीच्या थ्री सिक्स्टी वेस्ट टॉवरच्या ४३ व्या माळ्यावर ८६२५ स्क्वेअर फुटचा ड्युप्लेक्स फ्लॅट घेतला आहे. या फ्लॅटसोबच त्याने या सहा पार्किंग स्लॉट देखील खरेदी केले आहेत. शाहीद या घरात कधी जाणार हे अद्याप ठरलेले नाही. तसेच शाहीदने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा देखील केलेली नाही. मात्र शाहीदची बायको मीरा राजपूत सध्या दुसऱ्यांदा गरोदर असून नवीन बाळ या जगात येण्याआधीच कपूर शाहीद कुटुंबासोबत नवीन घरात जाईल असे बोलले जात आहे.