‘या’ अभिनेत्याच्या घरी पुन्हा हलणार पाळणा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहीद कपूर आणि मीरा राजपूत पुन्हा एकदा आई बाबा होणार आहेत. गेले काही दिवस मीरा पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत शाहीदने स्वतः याबद्दल सांगितले आहे. शाहीदने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मीशाचा एक फोटो शेअर करत आपण पुन्हा बाबा होणार असल्याचे सांगितले आहे.

❤️

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

या फोटोमध्ये मीशा फार आनंदात दिसत आहे. तिच्या बाजूला खडूने रंगीबेरंगी फुग्यांची चित्रे काढली आहेत आणि त्या फुग्यांच्या वर ‘बिग सिस्टर’ असे लिहिले आहे. यावरून शाहीद, मीरा आणि मीशा यांच्या घरी लवकरच एक पाहुणा येणार असल्याचे समजते आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मीराचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये मीरा गरोदर असल्याचे स्पष्ट दिसत होते. परंतु मीरा आणि शाहीदने याबाबत कोणती माहिती दिली नव्हती. आता शाहीदने हा फोटो शेअर करत तो पुन्हा बाबा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Happy Sunday.

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on