Video : बहुचर्चीत ‘कबीर सिंग’चा ट्रेलर प्रदर्शित, दमदार संवादाने जिंकले मन

1

सामना ऑनलाईन । मुंबई

शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांची प्रमुख भूमिका असणारा बहुचर्चीत ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रविवारी प्रदर्शित झालेल्या या अडीच मिनिटांच्या ट्रेलरने अवघ्या काही वेळात लाखोंचा हिट्स मिळवले. ट्रेलरमधील दमदार संवादाने नेटिझन्सचे मन जिंकले आहे. चित्रपट प्रदर्शनानंतर ब्लॉकबस्टर होईल अशी शक्यता बी टाऊनमध्ये रंगली आहे.

‘कबीर सिंग’ हा चित्रपट दक्षिणेमध्ये गाजलेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. त्यामुळे या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे. चित्रपटामध्ये शाहिद कपूर मेडिकलचा विद्यार्थी दाखवला आहे. यादरम्यान तो आपल्याच कॉलेजमधील कियारा उर्फ प्रितीच्या प्रेमामध्ये पडतो. परंतु प्रेयसी सोडून गेल्यावर तो व्यसनाच्या आहारी जातो. येथेच कबीर सिंगची भूमिका लक्ष वेधण्यासारखी आहे.

दक्षिणेकडील चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या या चित्रपटाला संदीप वांगा यांनी दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.