‘थुकरटवाडी’त शाहरुख आणि अनुष्काची धम्माल !

1

सामना प्रतिनिधी, मुंबई

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची, त्यातील थुकरटवाडी गावाची आणि गावातील मंडळीची हवा आता बॉलीवूडमध्येही जोरदार वाढत आहे. गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या ‘फॅन’ चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. आता पुन्हा एकदा आपल्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुखने थुकरटवाडीची वाट धरली. यावेळी शाहरुख एकटाच आला नाही तर त्याच्यासोबत या चित्रपटाची मुख्य नायिका अनुष्का शर्माही होती. येत्या सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० वाजता हा भाग प्रसारित होईल.