शाहरुखचा चड्डी-बनियानवर डान्स

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा पुढला चित्रपट तब्बल दीड वर्षानंतर रिलीज होणार आहे. तो या चित्रपटात बुटक्याची भूमिका साकारणार आहे. शाहरुखच्या चित्रपटाचा फर्स्ट लुक जाहीर करण्यात आला आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज होईल असे सांगण्यात येत आहे.

शाहरुख खानसोबत आनंद एल राय यांच्या या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरीना कैफ देखील दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा नाव ‘झिरो’ असेल.

फर्स्ट लुकमध्ये शाहरुख बुटका दिसत असून त्याने बनियान आणि चट्टेपट्टेवाली चड्डी घातलेली दिसते आहे.

शाहरुखने सोशल मीडियावर चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो नाचताना दिसतो. व्हिडिओच्या शेवटी चित्रपटाचे नाव झळकते.