आयसीसी वन डे रँकिंग; अष्टपैलूंत शकीब अग्रस्थानी

11

सामना ऑनलाईन । दुबई

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या वन डे रँकिंगमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा अनुभवी क्रिकेटपटू शकीब अल हसनने अग्रस्थान मिळवले आहे. अव्वल 10 खेळाडूंमध्ये हिंदुस्थानच्या एकाही खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आठवडय़ावर येऊन ठेपली असताना शकिबने ही किमया साधून सर्वाचे लक्ष वेधले.

आपली प्रतिक्रिया द्या