शामक दावर मराठी चित्रपटात करणार कोरियोग्राफी

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी चित्रपटसृष्टितील नवनवीन प्रयोगांमुळे तसेच हिट चित्रपटांमुळे सध्या अमेक बॉलिवूड कलाकार व तंत्रज्ञ मराठीकडे वळत आहेत. गेले अनेक वर्षे बॉलिवूडच्या नट नट्या ज्याच्या तालावर नाचत आहे असा प्रसिद्ध कोरियोग्राफर शामक दावर हा लवकरच मराठी चित्रपटसृष्टित पदार्पण करणार आहे. शामक ‘हदयांतर’ या बहुचर्चित  चित्रपटासाठी नृत्यदिर्ग्दन (कोरियोग्राफी) करणार आहे.

‘हदयांतर’ या चित्रपटाद्वारे प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस चित्रपट निर्मिती व दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. ‘माझी व शामकची मैत्री गेल्या पंचवीस वर्षापासून आहे. त्याच्यासोबत एकदातरी काम करण्याची माझी इच्छा होती. तसेच एकदा त्यांनीही माझ्यासोबत काम करण्यास कधीही तयार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मी त्यांना या चित्रपटाविषयी सांगितले व त्यांनी होकार दिला. शामक चित्रपटाच्या सेटवर आले होते. तेव्हा त्यांनी मला नटराजाच्या मूर्ती भेट म्हणून दिली होती.’ असे फडणीस यांनी सांगितले.

विक्रम फडणीस यांच्या यंग बेरी प्रोडक्शन हाऊस अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे  मुख्य भूमिकेत आहेत.