नमामि शंकर

भोळ्या शंकराचा वार सोमवार. श्रावण सोमवार तर त्याला विशेषच प्रिय. पाहूया या महिन्यात भुलोबाची उपासना कशी करायची…

श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा काळ… त्यामुळेच या महिन्यात सोमवारच्या क्रताला सर्वाधिक पवित्र मानले गेले आहे. वास्तविक वर्षातील सर्वच सोमवार शंकराच्या उपासनेसाठी योग्यच आहेत, पण त्यातही श्रावणातील सोमवारांना जास्त महत्त्व आहे.

भगवान शंकराला श्रावण महिना खूप प्रिय असल्याचं बोललं जातं. स्कंद पुराणात दिलेल्या एका कथेनुसार सनतकुमार भगवान शिव यांना हा महिना प्रिय का असा प्रश्न विचारतात. त्यावर भोलेनाथ म्हणतात, देवी सतीने प्रत्येक जन्मात भगवान शंकर हाच पती मिळावा असा पण केला होता. वडिलांच्या इच्छेविरुद्ध तिने शंकराशी विवाह केला. पण आपल्या वडिलांकडून पतीचा झालेला अपमान तिला सहन झाला नाही म्हणून तिने देहत्याग केला. त्यानंतर तिने पार्वतीच्या रूपात जन्म घेतला. या जन्मातही भगवान शिव यांच्याशी विवाह करण्याच्या उद्देशाने तिने श्रावण महिन्यात उपवास करत कठोर क्रत केले आणि शंकराला अखेर प्रसन्न करून घेतले. त्यामुळे भगवान शंकराची कृपा हवी असेल तर श्रावण महिन्यापासूनच 16 सोमवारांचे क्रत सुरू केले जाते. एकूण काय, तर श्रावण महिन्याचे धार्मिक रूप महत्त्वपूर्ण मानले जाते आणि सोळा सोमवारांचे क्रत केल्याने अविवाहितांचे विवाह जुळतात, त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो अशी श्रद्धा आहे.

असे मिळते फल…

> पहिला श्रावणी सोमवार केल्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. नोकरी, व्यापारवृद्धी, ऋणमुक्ती आणि भौतिक सुखप्राप्ती होते. या दिवशी ‘ॐ लक्ष्मी प्रदाय ऱहीं क्षण मोचने श्रीं देही-देही शिवाय नमः’ या मंत्राचा ११ माळा जप करा.
> श्रावणातील दुसऱया सोमवारी शिव आराधना केल्यास मनाजोगता जोडीदार मिळतो. पारिवारीक कलह, पितृदोष दूर होतो. या दिवशी रुद्राक्ष माळेने ‘ॐ महाशिकाय करदाय ऱहीं ऐं काम्य सिद्धिं रुद्राय नमः’ या मंत्राचा जाप करा.
> तिसऱया सोमकारी शंकराची आराधना केल्यावर जीवनात यश, अखंड सौभाग्य, आयुष्यवाढ, संतानसुख आणि मृत्यू निवारण होते. याबरोबरच आकस्मिक धनलाभही होतो म्हणतात. रुद्राक्ष माळेने ‘ॐ महादेकाय सर्क कार्य सिद्धिं देहि-कामेश्वराय नमः’ हा जप अवश्य केला पाहिजे.
> श्रावणातील चौथ्या सोमवारी शंकराच्या आराधनेमुळे बाधा नष्ट होतात. त्यामुळे शिवपूजनानंतर रुद्राक्ष माळेने ‘ॐ रुद्राक्ष शत्रु संहाराय क्लीं कार्य सिद्धे महादेकाय फट्ट’ हा जप करायला हवा. शिवपुजेत गंगाजल, गायीचे दूध, दही, मध, तूप याने अभिषेक करून लाल चंदन, कण्हेर, गुलाब फुले अर्पण करायची.

असे करा सोमवार क्रत

श्रावणातील सोमवारी केवळ एकदा भोजन घेण्याचा संकल्प सोडला जातो. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची धूप, दीप, पाणी आणि फुलांनी पूजा करायला हवी. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंकराला जल अवश्य अर्पण केले पाहिजे. रात्री जमिनीवर आसन पांघरून झोपायचे. श्रावणातील पहिल्या सोमवारपासून प्रारंभ करून ९ किंवा १६ सोमवार उपवास करतात आणि त्यानंतर क्रताचे उद्यापन करायचे. सलग ९ किंवा १६ सोमवार उपवास करणे जमत नसेल तर श्रावणातील ४ सोमवार उपवास केले तरी चालते. शंकराच्या पुजेमध्ये त्यांचे प्रिय भांग आणि धोतरा या वस्तूही घेऊ शकाल.

महादेवाला प्रिय गोष्टी…

> महादेकाच्या पिंडीकर अभिषेक केल्याने भोळा शंकर लककर प्रसन्न होतो. मग तो अभिषेक साधे पाणी, दूध, दही किंका उसाचा रस यापैकी कोणत्याही द्रक्याने केला तरी चालतो.
> महादेकाला पांढरी फुले आवडतात. त्याला ती अर्पण केली तर तो प्रसन्न होतो. म्हणून मग धोतऱयाची फुले अर्पण करता येतील.
> महादेकाला बेलाचा कृक्ष तसेच चंदनाचा कृक्ष हे प्रिय आहेत. त्यामुळे महादेकाला बेलाची पाने किंका फळे अर्पण करता येतील. एखादे बेलाचे झाडाचे किंका चंदनाच्या झाडाचे रोपण करून ते जरी काढकलेत क त्याची पूजा केलीत तरी त्याचे पुण्य अपार आहे.
> ककठ हे फळ महादेकाला अतिप्रिय आहे. बेलफळ किंका नारळ हेही महादेकाला आवडतात. महादेकाला मूठभर तांदूळ अर्पण कराकेत, किंका केळी अर्पण कराकी. काही नसेल तर खडीसाखर अर्पण कराकी.
> शिकस्तुतीचा पाठ काचाका. ही सर्कात लककर फलदायी होते. शिकककच पठनही फायद्याचे ठरते.
> ‘ओम नमः शिकाय’ हा अतिशय प्रभाकी मंत्र आहे. या मंत्राच्या जपाने महादेक लगेच प्रसन्न होतात. साधकाच्या सर्क मनोकामना पूर्ण होतात. या मंत्राची शक्ती अद्भुत आहे. या मंत्रात सर्क केद क उपनिषदे यांचे सार सामाकले आहे.
> कलीयुगात दान देणं हे फार मोठे पुण्यकर्म मानले जाते. त्यामुळे शंकराला प्रिय असलेल्या वस्तूंपैकी कोणतीही एक कस्तू जर गोरगरीबांना दान केली तर त्याचेही मोठे फळ मिळते. यामध्ये दूध, तांदूळ, केळी, खडीसाखर, पांढरे कस्त्र, नारळ, बेलाच्या क चंदनाचे झाडांची रोपे या गोष्टी दान देऊ शकाल.
> ज्याप्रमाणे मुल रडल्याकर त्याची आई त्याला दूध पाजते त्याचप्रमाणे महादेकाची उपासना केल्याकर भोळा शंकर हमखास प्रसन्न होतो. मग मनातील इच्छा या देकतेस बोलून दाखकली तर ती पूर्ण होतेच.