70 वर्षात काहीच झाले नाही, असे म्हणणे म्हणजे देशाचा अपमान : शरद पवार

9

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुढील लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष मिळून या जनविरोधी सरकारला हटवणार असा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. गेल्या 70 वर्षात काहीच झाले नाही असे म्हणणे म्हणजे देशाचा अपमान असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसपक्षासह विरोधी पक्षांकडून पुकारण्यात आलेल्या हिंदुस्थान बंदच्या वेळी रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

पवार म्हणाले की “गेल्या 70 वर्षात काहीच झाले नाही असे म्हणणे म्हणजे देशाचा आणि मजुरांचा अपमान आहे, आज ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी जर वाजपेयींनी सांगितलेला मार्ग पत्करला तर खर्‍या अर्थाने ती त्यांना श्रद्धांजली असेल.”

तसेच “देशात बदल अपेक्षित आहे. जनहितासाठी सर्वपक्षीयांनी मिळून देशाला स्थिर सरकार देणे गरजेचे आहे. हे जनविरोधी सरकार हटवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.” आपण जर प्रयत्न केले तर जनता नक्कीच साथ देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या