शेअर बाजारात २५६ अंकांची उसळी

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात शुक्रवारी २५६अंकांची वाढ होऊन तो ३४६९६ अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराच्या निफ्टीतही ७४ अंकांची वाढ होऊन तो १०,६९२ वर पोहोचला. बाजार उघडताच शेअर बाजाराचा निर्देशांक ३५,००० इतका नोंदवला गेला. २ फेब्रुवारीनंतर पहील्यांदाच शेअर बाजाराने ३४ हजाराचा टप्पा पार केला तर शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ५ फेब्रुवारीनंतर पहील्यांदाच १०,७०० अंकावर पोहोचला.

ऑक्सिस बँक, रिलायन्स, येस बँक, आयसीआयसीआय आणि आयशर मोटर यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसली. तर मारुती सुझुकीच्या शेअर्समध्येही वाढ दिसली. दरम्यान, एयरटेल, विप्रो, टीसीएस, टेक महिंद्रा आणि एचडीएफसी बँकेचे शेअर मात्र कोसळले.