मॉन्सूनपूर्व सरी बसरल्यानंतरही शेअर बाजारात घसरण

57

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शेअर बाजारात दोन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारी घसरण झाली असून घसरणीनेच बाजाराची सुरुवात झाली आहे. मेटल आणि एनर्जी सेक्टर वगळता इतर क्षेत्रातील शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. बाजार सुरू होताच निर्देशांक 142 अंकानी घसरून 39808.57 वर आला होता. तर निफ्टीमध्येही 45.10 अंकांनी घसरण होऊन निर्देशांक 11,920.50 वर आला होता. सुरुवातीच्या सत्रात 230 शेअरमध्ये मजबुती दिसली. तर 430 शेअरमध्ये घसरण दिसून आली. केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले असून मॉन्सून देशभरात आगेकूच करत आहे. मात्र, मॉन्सूनला झालेल्या विलंबाचा बाजारावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

यस बँक, एसबीआय, इंडियाबुल हाऊसिंग, ओएनजीसी, झी इंटरटेनमेंट,भारती एअरटेल, इन्फोसिस या शेअरमध्य घसरण दिसून आली. तर डीएचएफएल, जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील, स्टरलाईट टेक, मदरसनसूमी, आयटीसी आणि एशियन पेंट्स या शेअरमध्ये तेजी दिसून आली. मेटल आणि एनर्जी सेक्टर वगळता इतर क्षेत्रातील शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. सोमवार आणि मंगळावारी बाजारात तेजी दिसून आली. मंगळवारी निर्देशांकात 165 अंकांची वाढ होऊन मुंबई बाजार 39,950.46 वर तर निफ्टी 11,950.60 अंकांवर बंद झाला होता. मंगळवारी 1141 शेअरमध्ये तेजी तर 1393 शेअरमध्ये घसरण दिसून आली.

या आठवड्यात बाजाराचे लक्ष मॉन्सूनच्या प्रगतीवर राहणार आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक उत्पादन, महागाई, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध आणि कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती याचाही बाजारावर परिणाम होणार आहे. देश परदेशातील विविध आर्थिक संस्थाचे अहवालही या आठवड्यात येणार आहेत. त्या आकड्यांवरुनही बाजाराला दिशा मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या