भाजपविरोधी पोस्ट केल्याने शशी थरूर फसले, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

सामना ऑनलाईन । मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील काँग्रेसवरील टीकेचा समाचार घेताना काँग्रेसचे खासदार शशी थरूर चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांनी पंतप्रधानांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी थरूर यांनी एक व्हॉट्सअॅप मेसेज आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला. ही पोस्ट केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली.

थरूर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की, ‘काँग्रेसने ६० वर्षं काय केलं हे माहीत नाही, पण आपल्या वडिलधाऱ्यांनी भाजपला ६० वर्षं निवडून का दिलं नाही ते या चार वर्षांमध्येच कळलं.’ या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली. काही नेटकरी थरूर यांच्या बाजूनेही बोलताना दिसले. यातील एका नेटकऱ्याने, काँग्रेसच्या साठ वर्षांत एक चहावाला पंतप्रधान झाला पण, भाजपच्या चार वर्षांच्या काळात सुशिक्षित लोक पकोडे तळत आहेत, असं म्हटलं आहे. तर एकाने थरूर यांचा बुद्ध्यांक व्हॉट्सअॅप एवढाच असल्याचं म्हटलं आहे.