महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध

सामना प्रतिनिधी । नगर

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची कार्यकारी नुकतीच जाहीर झाली आहे. या संघटनेच्या उपाध्यक्षपदी नगर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दोन दिवसापूर्वी संघटनेच्या अध्यक्षपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली होती. उर्वरीत कार्यकारिणी मंगळवारी जाहीर झाली असून त्यामध्ये राज्यात चार उपाध्यक्षपदे देण्यात आली आहेत. त्यापैकी शशिकांत गाडे यांच्या रूपाने नगरला उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

उपाध्यक्ष पदाच्या चार व्यक्तीमध्ये शशिकांत गाडे (नगर), आमदार अमरसिंह पंडीत (बीड), दिनकर पाटील (सांगली), देवराम नाना भोईर (ठाणे) तर सहकार्यवाहपदी आस्वाद पाटील (रायगड), मोहनराव गायकवाड (नाशिक), रवी देसाई (रत्नागिरी), मदनराव गायकवाड (सोलापूर), महादेव साठे (उस्मानाबाद) अशी निवड करण्यात आली आहे. गाडे यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातून शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला आहे व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.