अयोध्याप्रकरणी शांततापूर्ण तोडग्यासाठी शिया बोर्डाचा प्रयत्न

सामना ऑनलाईन । लखनौ

अयोध्याप्रकरणी शांततापूर्ण तोडगा निघावा, यासाठी उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने ६ डिसेंबर रोजी एक प्रस्ताव तयार करणार असल्याचे आज जाहीर केले. बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ते अयोध्येतील संत-महंतांना येत्या महिनाभरात भेटतील. रिझवी पुढे म्हणाले, अयोध्या प्रकरणी परस्पर सामंजस्यातून शांततापूर्ण तोडगा निघावा यासाठी काही संतमहंत तसेच पक्षकारांशी अटीशर्तींबाबत चर्चा झालेली आहे. येत्या ६ डिसेंबरपर्यंत शांती प्रस्ताव तयार होईल अशी आशा आहे.

रिझवी यांनी गेल्या महिन्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली होती. या भेटीत शिया वक्फ बोर्डाची बाजू त्यांनी स्पष्ट केली होती. वादग्रस्त जागेवर मंदिरच बनले पाहिजे. रामजन्मभूमीच्या जागेवर मशीद बांधू नये, अशी शिया वक्फ बोर्ड भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.