हम हौसलों से उडते है… शिखरचे ट्वीट व्हायरल

360
shikhar-dhavan-news

सामना ऑनलाईन । लंडन

टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज शिखर धवन दुखापतग्रस्त असल्याने तो पुढले सामने खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऋषभ पंतला देखील वर्ल्ड कपस्पर्धेसाठी तयार राहण्यास बीसीसीआयने सांगितले आहे. मात्र असे असतानाच शिखरच्या ट्विटर हँडलवरून दोन फोटो आणि एक शेअर ट्वीट करण्यात आला आहे. ‘आम्ही पंखांनी नाही, तर जिद्दीने उड्डाण करतो…’ अशा आशयाचे वाक्य असल्याने शिखर पुढले सामने खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत मिळत आहे.

Kabhi mehek ki tarah hum gulon se udte hain…
Kabhi dhuyein ki tarah hum parbaton se udte hain…
Ye kainchiyaan humein udne se khaak rokengi…
Ke hum paron se nahin hoslon se udte hain…
#DrRahatIndori Ji

शिखरने जखमी झाले असतानाचे आपले फोटो काही वेळापूर्वी ट्वीट केले आहेत. मात्र असे करतानाच त्याने कभी मेहक की तरहा हम गुलों से उडते है… कभी धुए की तरह पर्बतों से उडते है… यह कैचियां हमे उडने से खाक रोकेगी… के हम परों से नहीं हौसलों से उडते है… असा शेर ट्वीट केला आहे. राहत इंदौरी जी यांचा हॅशटॅग देखील वापरला आहे. शिखरचे हे ट्वीट जबरदस्त व्हायरल झाले आहे. अनेकांनी त्यांना लवकर बरा हो, मैदानात तुला खेळताना पाहायचे आहे, असे म्हणत सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या