शिल्पा शेट्टीच्या घरी आला नवीन पाहुणा, पाहा व्हिडीओ

204

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. तिने त्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत तो पाहुणा तिच्या कुशीत दिसत आहे.

पण गंमत म्हणजे हा पाहुणा म्हणजे बाळ नसून एक पोपट आहे. त्याचं झालं असं की, शिल्पा राहते त्या इमारतीच्या आवारातील बदामाच्या झाडावर या पोपटाचं घरटं आहे. तो घरट्यातून खाली पडला आणि शिल्पाच्या स्टाफने त्याला पाहून शिल्पाकडे आणून दिलं. त्याने उडायचा प्रयत्न करून पाहिला पण त्याला उडता येईना. तेव्हा शिल्पाने त्याची काळजी घेतली. व्हिडीओतही तो शिल्पाच्या कुशीत दिसत असून हळूहळू तिच्या खांद्यावर बसलेला दिसत आहे.
तिने त्या पोपटासोबतचे सुंदर क्षण व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या