कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

गणेशोत्सवाप्रमाणेच कोकणात शिमगोत्सवाचे मोठे प्रस्थ असते. शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येनं इतर शहरात स्थायिक झालेले कोकणवासी गावी येतात. शिमगोत्सवात ग्रामदेवतांचा पालख्यांच्या दर्शनासाठी चाकरमानी गावी येत असतात. शिमगोत्सवात पालखी नाचवण्याचा अभूतपुर्व सोहळाही रंगतो.

shimga-kathiरत्नागिरी पट्ट्यामध्ये ज्या पद्धतीने होळी रचली जाते ते बघणं देखील फार रंजक असतं. शेवरी किंवा अन्य वृक्षाच्या फांद्यांची तोड करुन वाजतगाजत त्या गावात आणल्या जातात. त्या फांद्यांची होळी उभी केली जाते. सलग १० दिवस रात्री फाका देऊन शिमगोत्सव साजरा केला जातो. शेवटच्या दिवशी म्हणजे शिमग्याच्या दिवशी मध्यरात्री होम पेटवला जातो.

 

shimga-palkhi-nrutyaहोळी पेटतेवेळी ग्रामदेवतेची पालखीही नाचवण्यात येते. पालखी नाचवणे हा एक सन्मान समजला जातो. कोकणामध्ये पालखी नाचवण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. काही ठिकाणी दोन्ही खांद्यांवर घेऊन पालखी नाचवली जाते. अनेक ठिकाणी एक व्यक्ती डोक्यावर पालखी घेऊन ती नाचवते.

 

shimga-dholपालखी नाचवणे हा एक सोहळाच असतो. रत्नागिरीतील फणसोप येथील श्रीदेव लक्ष्मीकेशवाचा शिमगोत्सव पालखीनृत्यामुळेच अधिक लोकप्रिय झाला. शिमगोत्सवाच्या शेवटच्या दोन दिवस या शिमगोत्सवातील पालखीनृत्य पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरासह रत्नागिरी शहरातील लोक गर्दी करतात. शिमगोत्सवात भांगही प्यायली जाते. गावातून भांग आणि मटणवड्यावर अनेकजण ताव मारतात. यावेळी गावामध्ये बाहेरुन येणाऱ या प्रत्येकाला हे मटणवडे दिले जातात.