शिर्डीत लाखो भाविकांच्या साक्षीने नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत, रात्रीच्या बाराच्या ठोक्याला मंदिर परिसरात साई नामाचा जयघोष

देशविदेशातील साईभक्त शिर्डीमध्ये रात्रीच्या बाराच्या ठोक्याची वाट पाहत सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत साई नामाच्या जयघोषाने करीत एकच जल्लोष साई भक्तांनी केला. साईंच्या भक्तांनी नव्या वर्षाचे जोरदार स्वागत केले.

देश- विदेशातून आलेले साई भक्त हे 31 डिसेंबर रात्री बरोबर 12 वाजेच्या ठोक्याला काही साई भक्त मंदिरात थांबण्यासाठी रेंगाळेत होते, तर काही भक्त द्वारकामाई, चावडी तर काही भक्त हे गुरुस्थान या ठिकाणी तळ ठोकून बसले होते. काही साई भक्तांनी बरोबर रात्री 12 चा मुहूर्त साधला. मात्र थोड्या फार वेळेत मागे पुढे झाल्याने काहीं भक्तांची निराशा झालेली पाहवयास मिळाली. मात्र साई संस्थान रात्रीचे दर्शन चालू ठेवल्याने साई भक्तात समाधान पहावयाला मिळाले. नेमकी बारा वाजेच्या सुमारास मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांना तारेवरची कसरत करावी लागली. रात्री 12 वा. दर्शन करण्यासाठी भाविकांनी दिवसभर शिर्डीत खरेदी, बाहेर जाऊन छोटेखानी दर्शन यात्रा करून बरोबर 12 वा. येऊन सरत्या वर्षाला निरोप आणि नवं वर्षाचे स्वागत साई दर्शनाने करण्याचा अट्टाहास केलेला पाहायला मिळाला.

दुसरीकडे शिर्डीच्या शहरातील रस्त्यावर असणारी नवं वर्षाची गर्दी नव्या दर्शन इमारतीने पाहायला मिळाली नाही. नव्या दर्शन बारीमुळे भाविकांना प्रथमतः दर्शनासाठी उभे राहता आले नाही. सर्व गर्दी ही साई मंदिर परिसरात द्वारकामाई परिसरात एकवटली होती. एक नंबर प्रवेशद्वारचा परिसर दिवसभर मध्यम तीव्र स्वरूपात गर्दी पहावयाला मिळाली. मात्र सायंकाळी ही ओसरली होती. पुन्हा 10 वाजेच्या भाविकांनी दर्शन बारीकडे मोर्च्या वळवला. आणि रात्रीच्या बाराच्या ठोक्याला साई नामाचा एक जल्लोष झाला. शहरात इतर ठिकाणी रंगीबेरंगी अवकाशात फटाके उडू लागले. लख्ख लख्ख साई नगरीत न्हाऊन निघाली होती.

नवीन वर्षाच्या स्वागताला साई मंदिर लाखो फुलांनी सजविण्यात आले होते. यासाठी साईभक्त ए. बसवराजा यांच्या देणगीतून साई मंदिराचा गाभारा ओम साई राम नाव फुलांनी तयार केले होते. ते मुख्य आकर्षण ठरत होते. साई मंदिरात फुलांनी सजवलेला गाभारा भाविकांच्या डोळ्याचा पारणे फेडणारा होता. दुसऱ्या बाजुला साई प्रसादलयात सुमारे पन्नास भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रसादलयतील वाढती गर्दी लक्षात घेता. प्रशासनाने रात्री एक तास प्रसादलय जास्त उघडे ठेवले अशी माहिती प्रसादलय प्रमुख विष्णू थोरात यांनी दिली. साई भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या गस्ती आणि सुरक्षा वाढवण्यात आल्या होत्या. तर भक्तनिवास फुल्ल असले तरी अतिरिक्त भक्तनिवासाची व्यवस्था केलेली असल्यामुळे भाविकांची सुविधा झाली. भक्तनिवासाच्या ठिकाणी चहाचे स्टॉल उशीरा पर्यंत सुरू ठेवून सकाळी पुन्हा लवकर सुरू केल्याने भाविकांना सुविधा मिळाल्या.