मोटारसायकलींच्या धडकेत एक ठार, दोन जखमी

सामना ऑनलाईन । कवठे येमाई

शिरूर तालुक्यातील मलठणनजीक न्यू इंग्लिश स्कूलजवळ दोन मोटारसायकलींच्या धडकेत एक जण ठार झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेबाबत बाबू मोमीन यांनी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

मलठणनजीक सोमवारी झालेल्या दोन मोटारसायकलींच्या अपघातात सलमान कमाल मोमीन (२४) याचा मृत्यू झाला. टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथील पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलठण गावच्या न्यू इंग्लिश स्कूलसमोर सुरज संभाजी गावडे (रा. निमगाव दुडे) आपल्या दुचाकीवरून भरधाव निघाला होता. त्याने संतोष पानगे यालाही डबल सीट घेतलं होतं. भरधाव वेगाने जात असताना मोमीन याच्या गाडीला गावडेच्या गाडीने धडक दिली. या अपघातात सलमान याचा मृत्यू झाला तसेच गाडीला धडक देणाऱ्या दोघांनाही गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणी शिरुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश कोकरे हे करत आहेत.