शिवजयंती उत्साहात, भव्य-दिव्य शोभायात्रेने पेणकर भारावले

सामना प्रतिनिधी । पेण

पेण शहर व तालुक्यात शिवसेनेतर्फ शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी पेण शहरातील शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तालुका प्रमुख नरेश गावंड यांनी सपत्नीक अभिषेक घालून पुजाअर्चा करण्यात आली. याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिवाजी महाराजांची भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.

शहरातील चौकाचौकात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या जिवनावरील आकर्षक चित्ररथ काढण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये पुरूषांनी भगवे करून फेटे बांधून तर महिला मराठमोळी नऊवारी साडी व डोक्यावर फेटे बांधून सहभागी झाले होते. युवासेनेतर्फे मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या शोभा यात्रेत उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, शहर प्रमुख ओंकार दानवे, माजी जिल्हा प्रमुख शैलेश पाटील, माजी शहर प्रमुख अशोक वर्तक, जनार्दन कडू, वाहतूक सेनेचे सोनावणे , ग्राहक संरक्षणाचे नंदू मोकल, रविंद्र पाटील, प्रमोद घरत, तुकाराम म्हात्रे, तालुका प्रमुख गिता म्हात्रे, ज्योती म्हात्रे, दिपश्री पोटफोडे, सुनंदा गावंड, उपशहर प्रमुख वंदना पाशिलकर, यांच्यासह शिवसैनिक, शिवप्रेमी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.