शंकराची पौर्णिमा

257

त्रिपुरारी पौर्णिमा.
खास शिवशंकराची पौर्णिमात्याच्या विजयोत्सवाची पौर्णिमा.

श्री शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला तो दिवस कार्तिक पौर्णिमा… हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो. हा देकांचा उत्सक असून असुरी शक्तीकर चांगल्या शक्तीचा किजय म्हणून तो हिंदुस्थानात अनेक मंदिरांमध्येही तो उत्साहात साजरा होतो. त्रिपुरारी पौर्णिमा हा उत्सक कार्तिक पौर्णिमा या तिथीला साजरा केला जातो.

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. त्यामागचं कारण असं आहे की त्रिपुरासुराचा वध भगवान शंकराने केला आहे. या राक्षसाची नगरी प्रचंड मोठी होती. पृथ्वी, अवकाश आणि पाताळ या तीनही ठिकाणांवर या राक्षसाचं राज्य होतं. त्याचा नायनाट करण्याचं काम कठीण होतं. पण भगवान शंकराने ते केलं. आपल्या शरीरामध्येही त्रिदोष असतात. कफ, पित्त आणि वायू… याच्याशी संबंधित हा असुर आहे. त्यामुळे आपल्या शरीरशास्त्राशी त्याचा कुठेतरी संबंध लागतो. माणसाची पिंडी म्हणजे शंकराची पिंडी. म्हणजेच प्रत्येक माणूस हा शिवाची पिंडी आहे असं मानलं जातं.

एकंदरीतच पार्वती आणि शिवशंकर या दोघांची संकल्पना जी वर्णन करण्यात आली आहे त्यात त्रिपुरारी पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केला म्हणून या दिवशी त्रिपुरासुराचे दर्शन घेतले तर माणूस धनवान होतो आणि सर्व संकटांपासून मुक्त होतो असं शास्त्र्ाकारांनी सांगितलंय.

असेही फायदे

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुपाच्या दिव्यांमुळे वातावरणात एक प्रकारचा थंडावा येतो. शिवाय एक प्रकारची ऊर्जा मिळते. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला शंकराचे पूजन, अभिषेक, रात्रीच्या वेळी सहा कृत्तिकांचे पूजन आणि वृषभाचे दान महत्त्वाचे मानले गेले आहे.

या दिवशी उपास करायला शास्त्रकारांनी सांगितलेले आहे. हा उपास केला, त्रिपूरवाती लावल्या, भगवान शंकरांच्या स्तुतीचे स्तोत्र म्हटले, नाहीतर ‘ओम नमः शिवाय’ हा साधा मंत्र जास्तीतजास्त वेळा म्हटला तरी अग्निस्तोम नावाच्या यज्ञाचं फल प्राप्त होतं.

दुसरं म्हणजे भगवान विष्णू यांनी जो मत्स्यावतार धारण केला होता तो याच दिवशी. या दिवशी गंगेमध्ये स्नान करण्याचं खूप महत्त्व असल्याचं शास्त्रकार सांगतात. कार्तिक पौर्णिमेला श्रीकृष्ण आणि राधेचं पूजन केलं जातं. कार्तिक पौर्णिमेला गंगास्नान, दीपदान, हवन, यज्ञ, नामस्मरण या गोष्टी केल्या तर आयुष्यात धनधान्य, पैसाअडका, संतती यात कमतरता येत नाही.

सहा कृत्तिकांचे पूजन

या दिवसाला एकूण सहा कृत्तिका देव्य मानल्या गेल्या आहेत. त्यामुळे संध्याकाळी आपण शिव, संभुती, संतती, प्रीती, अनसूया आणि क्षमा या सहा कृत्तिका सांगण्यात आलं आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी या सहा कृत्तिकांचं पूजन केल्यास माणसाला विशेष पुण्य प्राप्त होतं असं म्हटलंय.

आपली प्रतिक्रिया द्या