रेकॉर्डब्रेक कावड यात्रेसाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी केले जिल्हाप्रमुख दानवेंचे अभिनंदन

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगरात मागील श्रावण महिन्यात काढण्यात आलेल्या ‘हर-हर महादेव’ कावड यात्रेस वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या यात्रेचे संयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे अभिनंदन केले आहे.

हजारो हिंदू बांधवांचा सहभाग असणारी हर-हर- महादेव कावड यात्रा प्रथमच संभाजीनगरात समस्त हिंदू बांधवांच्या पुढाकाराने आयोजित केली होती. हरसिद्धी माता मंदिर, हर्सूल ते खडकेश्वर महादेव मंदिर मार्गावर आयोजित यात्रेत २५१ फूटांची अखंड कावड शेकडो हिंदू तरुणांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे उचलली होती. ही कावड यात्रा संभाजीनगरात हिंदू एकतेचे प्रतीक बनली आहे. या कावड यात्रेत संयोजक अंबादास दानवे, दयाराम बसैय्ये बंधू, शिवाजी इंजे पाटील, जोगेंद्रसिंह चौहान, विलासराव देशमुख तसेच विविध धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी, विविध क्रीडा मंडळे, वेगवेगळे संप्रदाय, भजनी मंडळ यांचा सहभाग होता.