विकासकामांची फाईल चार महिने या टेबलावरून त्या टेबलावर

86

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

कल्याण-डोंबिवली प्रभागातील विकासकामांची फाईल चार-चार महिने एका टेबलाकरून दुसऱया टेबलावर फिरत असते. याविषयी महिला नगरसेविका दाद मागायला गेल्या तर आयुक्त ती फाईल फेकून देतात. प्रशासनाकडून वारंवार ही अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा उद्रेक आज महासभेत झाला. शिवसेनेच्या रणरागिणींनी तर रौद्र अवतार घेत आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त करून माफी मागावी अशी थेट मागणी केली. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचत अधिकाऱयांना धाऱयावर घेतले. यावर महापौर विनिता राणे यांनी निर्देश देऊनही आयुक्त गोविंद बोडके यांनी काहीही बोलण्यास नकार दिल्याने संतापलेल्या शिवसेनेसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यामुळे अखेर महापौरांनी कोणतेही कामकाज न करता आजची सभा तहकूब केल्याचे जाहीर केले.

नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांवर आयुक्त बोडके काहीतरी शेरे मारून ती फाईल अधिकाऱयांकडे पाठकितात. त्यामुळे कामेच मंजूर होत नाहीत. आयुक्तांकडे फाईल घेऊन गेले असता थेट गटार, पायकाटची कामे मंजूर करणार नाही असे सांगून फाईल फेकून देतात, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या नगरसेविका संगीता गायकवाड व छाया वाघमारे यांनी सभा सुरू होताच केला. त्यावर शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी आयुक्तांनीच यावर उत्तर द्यावे अशी मागणी केली. महापौरांनी निर्देश दिल्यानंतर आयुक्त गोविंद बोडके यांनी आपण फाईल फेकून दिली नाही असा खुलासा दिला.

आयुक्तांनी हात वर केले
स्मार्ट सिटीकडे कल्याण झेप घेत असले तरी विकासकामांसाठी पालिकेकडे पैसेच नसल्याचे आयुक्त गणेश बोडके यांनी महासभेत स्पष्ट केले. महापालिकेतील आर्थिक स्थिती नाजूक असून 31 जुलैपर्यंतच ठेकेदारांची बिले काढण्याइतकाच निधी पालिका तिजोरीत असल्याचे सांगत त्यांनी नवीन विकासकामांबाबत हात वर केले.

आपली प्रतिक्रिया द्या