शिवसेना महिला जिल्हा संपर्कसंघटक जाहीर

सामना प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना महिला जिल्हा संपर्कसंघटकांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या.

अर्चना अरुण नाईक (सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला), कोमल जामसंडेकर (मालवण, देवगड, कुडाळ), सुप्रदा फातर्पेकर (देवगड, कणकवली, वैभववाडी), मिनल प्रवीण जुवाटकर (लांजा, राजापूर, संगमेश्वर), जयश्री बाळ्ळीकर (रत्नागिरी विधानसभा), ज्योती भोसले (चिपळूण विधानसभा), यामिनी यशवंत जाधव (गुहागर, मंडणगड, दापोली, खेड), किशोरी किशोर पेडणेकर (खारघर, पनवेल, पेण, अलिबाग, मुरूड), सुवर्णा सहदेव करंजे (माणगाव, रोहा, महाड, श्रीवर्धन), संध्या सुरेश वढावकर (ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई), ममता महेश चेंबूरकर (पालघर), उषा मराठे (वसई, नालासोपारा विधानसभा), दीपा पाटील (बोईसर, डहाणू विधानसभा), मृणाल महेश यज्ञेश्वर (भिवंडी), रंजना सुरेश नेवाळकर (नाशिक, शिर्डी), रिता वाघ (नगर – उत्तर व दक्षिण), राजुल पटेल (जळगाव विधानसभा), मनीषा कायंदे (संभाजीनगर, जालना, बीड), तृष्णा चंद्रकांत विश्वासराव (पुणे शहर), दीपमाला बबन बढे (पुणे ग्रामीण), श्रद्धा श्रीधर जाधव (हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, करवीर), रंजना बाळासाहेब शिंत्रे (चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर), युगंधरा साळेकर (सातारा), छाया कोळी (सांगली), संजना घाडी (सोलापूर), शिल्पा सरपोतदार (लातूर, परभणी) अशा या नियुक्त्या असल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.