रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे संतोष गोवळे बिनविरोध

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेचे मंडणगड येथील जिल्हापरिषदेचे सदस्य संतोष गोवळे बिनविरोध विजयी झाले.

संतोष थेराडे यांचा उपाध्यक्ष पदाचा कालावधी पूर्ण होताच त्यांनी पदाचा राजीनामा दिला. रिक्तपदासाठी गुरुवारी निवडणूक झाली. शिवसेनेकडून संतोष गोवळे यांना उमेदवारी जाहीर केली.उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. विजयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला.

रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक ,जिल्हाप्रमुख विलास चाळके,युवासेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य योगेश कदम, जि.प. अध्यक्षा स्वरुपा साळवी, गटनेते उदय बने, सभापती विनोद झगडे, सहदेव बेटकर,साधना साळवी, प्रकाश साळवी, माजी सभापती दत्ता कदम, दिपक नागले उपस्थित होते. यावेळी विषय समित्यांच्या सदस्यांची निवड झाली. त्यामध्ये स्थायी समिती-महेश म्हाप, कृषी समिती-ऋतुजा खांडेकर,सोनाली निकम,विभांजली पाटील,अभिजीत तेली,संजय नवाथे, पशुसंवर्धन समिती-अर्पणा नक्षे, पुनम पाष्टे, महिला बालकल्याण समिती-स्नेहा सावंत, वित्त समिती संतोष थेराडे, अरुण कदम बांधकाम समिती-अरुण कदम आरोग्य समिती- ऋतुजा खांडेकर, स्नेहा सावंत समाजकल्याण समिती संतोष थेराडे आणि दिपक नागले यांची निवड झाली.