महायुतीकडे विकासाचा तर विरोधकांकडे अपप्रचाराचाच जाहीरनामा – संजय जाधव

21

सामना प्रतिनिधी । सेलू

लोकसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप महायुतीकडे विकासाचा तर विरोधकाकडे केवळ अपप्रचाराचा जाहीरनामा होता यामुळे मतदारांनी महायुतीला विजयी केले, असे विधान शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत घडलेला मी सामान्य शिवसैनिक असून सामान्य जनतेसोबतच अहोरात्र काम करणार आहे. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. परभणी जिल्ह्याचा भगवा कधीही उतरला नाही आणि शिवसैनिक तो नेहमी फडकवत ठेवणार आहेत. तसेच यापूर्वी कधी झाली नाही अशी यावेळची लोकसभेची निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची केली. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राष्ट्रवादीने निवडणूक लढविली तसेच सामान्य जनतेची मने देखील कलुषित करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले. परंतु सामान्य जनतेने मात्र शिवसेना भाजप वर विश्वास दाखवल्याने आपला विजय झाला आहे असे मत शिवसेनेचे नवनियुक्त खासदार संजय जाधव यांनी केले.

शिवसेना व भाजप च्या सर्व कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली.तळागाळात जाऊन पक्षाचे धोरण समजावून सांगितल्याने मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकला. या निवडणुकीत सर्व नेते हरले आणि जनता जिंकली आहे. ही निवडणूक जनतेची होती.निवडणुकीत पाठीत वार करणारे जास्त होते पण पाठीमागून वार करण्यापेक्षा समोरून करा तेव्हा मी स्वतः आणि माझे शिवसैनिक पुरून उरतो. सर्वसामान्य मतदार हा शिवसेना भाजपच्या पाठीशी असल्याने विजय निश्चित झाला, असेही यावेळी खासदार संजय जाधव यांनी सांगितले. साई नाट्यगृहात शिवसेनेचे खा.संजय उर्फ बंडू जाधव यांचा शिवसेना व भाजपच्या वतीने नागरी सरकारचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी ते बोलत होते.

आपली प्रतिक्रिया द्या