कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच लोकसभेचा गड सर करू शकलो – संजय जाधव

8

सामना प्रतिनिधी । परतूर

लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधकांनी एकत्र येऊन मला पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र सामान्य गरीब कार्यकर्त्या व अठरापगड जातीच्या मतदारांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला. तसेच महायुतीचे कार्येकर्ते माझ्या विजयासाठी झटले म्हणूनच मी परभणी लोकसभेचा गड सर करू शकलो असे भावूक उद्गार खासदार संजय जाधव यांनी काढले. बुधवारी जालना जिल्ह्यातील परतुर तालुका शिवसेना व नागरिकांच्यावतीने आयोजित नागरी सत्कारात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर राहुल लोणीकर, परभणी शिवसेना जिल्हाप्रमुख ढगे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख माधवराव कदम, तालुकाप्रमुख अशोक अघाव, उपतालुका प्रमुख संतोष फोके,विठ्ठल वटाणे, मधुकर खरात, हरिभाऊ टेकाळे, भारत पंडीत, मधुकर पाईकराव,दत्ता सुरूंग, राजेद्र मुंदडा, दिपक हिवाळे, माऊली राजबिंडे, अजय कदम,लक्ष्मीकांत कवडी, संपत टकले, जिजा बोनगे, ओम मोर, रामेश्वर तनपुरे, रामप्रसाद थोरात, भगवान मोरे, द.या.काटे, शिवहरी वाघमारे, वंसत भापकर,बावुराव बोरकर, दिलीप निकम, बंडु थोरात, डॉ.मोगरे, अशोक हिवाळे, विठ्ठललिपणे, व्यापारी संघाचे शिवजी दरगड, दिलीप होलाणी, जगदिश झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या