पालघरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची झंझावती सभा

सामना ऑनलाईन । पालघर

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने प्रचाराचे रान उठवले असून श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचे भगवे तुफान पालघर जिल्ह्यात अवतरले. नालासोपारा येथील वसंत नगरी मैदानावर उद्धव ठाकरे यांची झंझावाती सभा झाली. मी वनगा परिवाराच्या अश्रूला न्याय मागण्यासाठी आलोय. या अश्रूंना न्याय नक्की मिळणार’ असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.

 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात
 • ‘इकडे राजकुमार येऊन डायलॉग मारुन गेले’
 • उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
 • ‘फक्त निवडणुकीपुरते भूंकू नका’
 • ‘लढायचे असेल तर मर्दासारखे लढा’
 • ‘आमची अवलाद शिट्टी फुंकणारी नाही’
 • ‘वर्षभरात निवडणूक येणार आहे’
 • ‘तुम्ही गावितांशी विधानसभेचे बोलणे करुन ठेवले होते’
 • ‘श्रीनिवास यांना तीन महिन्यात का सांगितले नाही’
 • ‘भाजपकडून वनगा कुटुंबीयांशी का बोलणे झाले नाही?’
 • मुख्यमंत्र्यांना बेईमानी कशाला म्हणातात हे समजले नसेल…
 • …तर कालचा ‘सामना’चा अग्रलेख वाचावा
 • ‘श्रीनिवास आले  तेंव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते’
 • ‘त्या अश्रूला न्याय देण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे’
 • उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना उत्तर
 • ‘बुलेट ट्रेनला वनगांचा विरोध होता’
 • ‘त्यामुळे वनगा तुम्हाला नको होता’
 • उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
 • ‘श्रीनिवास वनगांना भाजपने उमेदवारी दिली असती…
 • …तर याच व्यासपीठावरुन भाजपचा प्रचार केला असता’
 • ‘स्वत:चा लोकसभा मतदारसंघ राखू शकला नाही…
 • असा मुख्यमंत्री इथे येऊन मार्गदर्शन करतोय’
 • उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना टोला
 • ‘देश बदल रहा है’ हे मोदींसाठी खरे आहे
 • मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका
 • ‘कधीतरी आमच्या देशात या’
 • उद्धव ठाकरेंचे मोदींना आव्हान
 • ‘श्रीनिवास वनगा खासदार होणार’
 • उद्धव ठाकरे यांचा विश्वास
 • ‘हुकुमशाहीची खांडोळी करणारी शिवसेना जिवंत’
 • ‘गोरगरिबांच्या घरातील चूल विजू देणार नाही’
 • शिवसेनेचा प्रकल्पग्रस्तांना ठाम दिलासा
 • ‘पोटात असतं ते ओठात आलं’
 • रावसाहेब दानवे यांना टोला
 • ‘आता आम्ही ताकतीने उतरलो आहोत’
 • ‘आता इकडे कुणाचीही दहशत चालणार नाही’
 • उद्धव ठाकरेंचे पालघरच्या जनतेला आश्वासन
 • ‘इतर पक्षातून उमेदवार आयात करावी लागतात’
 • ‘चिंतन शिबिरातील नेते कुठे गेले?’
 • उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
 • ‘तुम्ही करता ते राजकारण’
 • ‘आम्ही खाजवतो ते गजकरण?’
 • ‘अटलजींना विसरले, तिकडे वनगा कोण?’
 • ‘हा वनगा नाही, वनवा आहे’
 • भाजपवर जबरदस्त हल्लाबोल
 • ‘मी वनगा परिवाराच्या अश्रूला न्याय मागण्यासाठी आलोय’
 • उद्धव ठाकरेंची मतदारांना भावनिक साद
 • ‘चार वर्षात २९ गावांचा प्रश्न सोडवता आला नाही’
 • ‘कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वेळीही असेच झाले होते’
 • ‘त्यावेळी आमचे दात मोजायला निघाले होते’
 • ‘आमच्या दातात कवळी नव्हती’
 • ‘त्यावेळी साडेसहा हजार कोटी देऊ अशी लोणकढी मारली होती’
 • ‘आजवर साडेसहा रुपये मिळाले नाहीत’
 • उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर जबरी टीका
 • ‘वनगा परिवाराच्या अश्रूला न्याय मिळणार’
 • उद्धव ठाकरेंचा जबरदस्त विश्वास

आपली प्रतिक्रिया द्या