महाडमध्ये शिवसेनेचा आज मेळावा

सामना प्रतिनिधा । महाड

महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा15 मार्च रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. शिवसेना नेते व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यासाठी जिल्हाप्रमुख रवी मुंढे, आमदार भरत गोगावले, दक्षिण रायगड संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले, दक्षिण रायगड महिला आघाडी संपर्कप्रमुख सुवर्णा करंजे, दक्षिण रायगड महिला आघाडीप्रमुख अनिता पवार, उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, महाड विधानसभा क्षेत्र संघटक अरुण चाळके, महाड विधानसभा सहसंपर्कप्रमुख विजय सावंत, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, अनिल नवगणे, नीलेश आयरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.