शिवसेनेच्या संजय जाधव यांचा विजय; पूर्णा, गंगाखेड, पालममध्ये जल्लोष

342

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा, पालम, जिंतूर आदी तालुक्यात शिवसेना खासदार संजय जाधव यांचा विजय जाहीर होताच कार्यकत्र्यांनी जल्लोष केला. चौका-चौकात फटाके फोडून जय भवानी जय शिवाजीचा नारा देत आनंदोत्सव साजरा केला.

पूर्णा येथे शिवसेना-भाजप व रासपाचे कार्यकत्र्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. जिल्हाप्रमुख विशाल कदम, उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे, नगरसेवक साहेब कदम, शहरप्रमुख मुंजाजी कदम, श्याम कदम, संतोष एकलारे, विकास वैजवाडे, प्रताप कदम, पप्पू कदम, अजय ठावूâर, तालुकाध्यक्ष बाळू कदम, सुनील कदम आदी कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

jadhav1

गंगाखेड येथील भगवती चौकात फटाके फोडण्यात आले. शिवसेना-भाजपा, रासपाचे पदाधिकारी, कार्यकत्र्यांचा यात सहभाग होता. परभणी तालुक्यातील नृसिंह पोखर्णी फाटा, पोरवड, आंबेटाकळी, तांबसवाडी, माळसोन्ना, दैठणा, इंदेवाडी आदी ठिकाणीही कार्यकत्र्यांनी फटाके फोडून आंनंद साजरा केला.

jadhav3

पालम येथील शिवाजी महाराज चौकात शिवसेना कार्यकर्त्यांनी व भाजप कार्यकत्र्यांनी, गुट्टे काका मित्र मंडळ कार्यकत्र्यांनी ढोल-ताशाच्या गजरात खासदार संजय जाधव निवडून आल्याबद्दल मोठ्या उत्साहात त्यांची फटाके वाजवून व पेढे वाटून जंगी स्वागत केले. निवडून आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व्यक्त केले.

jadhav4

यावेळी कार्यकर्ते बाळा शिरस्कर पालमचे उपनगराध्यक्ष बालासाहेब रोकडे, शहरप्रमुख गजानन पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष बाजगीर, लिंबाजीराव टाले, लक्ष्मण जाधव, युवा नेते गजानन शिरस्कर, ओम सिरस्कर, नगरसेवक सुनील शिरस्कर, नगरसेवक चंद्रकांत ताटे, गुटे काका मित्र मंडळ तालुकाध्यक्ष साहेबराव सुरनर, मुंजाजी भाऊ रोकडे, ताहेर खाँ पठाण, अंकुश शिंदे, प्रल्हाद रोकडे, अंकुष गिरी, रवी सिरस्कर, प्रवीण सिरस्कर, बाळू स्वामी, चक्रधर ज्ञानोबा खोंड, सुजित मालेवाडी, बाबासाहेब एंगडे आदी कार्यकत्र्यांनी ‘जय भवानी जय शिवराय, तसेच येऊन…. येऊन येणार कोण असे नारे दिल्याने पालम शहर दणाणले होते. व्यापाऱ्यांना गुलाल व पेढे वाटून मतदान दिल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या