शिवसेनेच्यावतीने किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम

सामना प्रतिनिधी । मालवण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तालुका व शहर शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने या मोहीमेत सहभागी झाले होते.

सकाळी किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत चाललेल्या या स्वच्छता मोहीमेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, बॉटल गोळा करण्यात आल्या. किल्ल्यात वाढलेले गवत, झाडी तोडून त्याचीही विल्हेवाट लावण्यात आली.

या मोहीमेत तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्यहरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, वेंगुर्ले तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, मालवण तालुकाप्रमुख मंदार गावडे, किसन मांजरेकर, महेश मेस्त्री, नंदू गवंडी, महेश शिरपुटे, प्रवीण लुडबे, नाना नेरुरकर, नगरसेविका सेजल परब, नगरसेविका सुनीता जाधव, नगरसेविका तृप्ती मयेकर, महिला तालुका संघटक दीपा शिंदे, राम रावराणे, रूपेश कदम, योगेश दळवी, आतु फर्नांडिस, दर्शन म्हाडगुत, अमित भोगले, अक्षय रेवंडकर, भार्गव खराडे, श्रेयस रेवंडकर, अक्षय भोसले, वायरी सरपंच भाई ढोके, उपसरपंच संदेश तळगावकर, आनंदव्हाळ उपसरपंच शैलेश भोसले, ज्योती खोबरेकर, शीला लुडबे, चंद्रकांत खोबरेकर, प्रवीण रेवंडकर, शैलेश मयेकर यांच्यासह अन्य शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.