NDA Meeting- उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी आणि अमित शहांशी मनमोकळी चर्चा

179

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

सर्वच जनमत चाचण्यांमधून दिल्लीच्या तख्तावर पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार दणदणीत बहुमताने सत्तेवर येण्याचे भाकीत वर्तवले आहे. या भाकीतानंतर एनडीएच्या सहयोगी पक्षांसाठी स्नेहभोजाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जमलेल्या सगळ्या पक्षांनी देशातील सामान्य जनतेपुढचे प्रश्न सोडवण्यासाठी  देशाला मजबूत आणि विकासाभिमुख सरकार पुन्हा देऊ असा निर्धार व्यक्त केला.

1. राजधानीतील हॉटेल ‘अशोका’मध्ये ही बैठक पार पडली.

nda-meeting-7

2. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी एनडीएतील घटक पक्ष प्रमुख आणि नेत्यांसाठी रात्री खास स्नेहभोजन आयोजित केले होते

nda-meeting-4

3. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे यावेळी सोबत होते.

nda-meeting-9

4. देशभरातील सर्वच सर्वेक्षण संस्था, वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलमधून ‘अब की बार, पुन्हा एनडीएचे सरकार’ असा कौल दिला आहे. त्यामुळे एनडीएच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे

nda-meeting-3

5. हॉटेल अशोका येथे झालेल्या या बैठकीला एनडीएतील घटक पक्षांचे 20 नेते उपस्थित होते.

nda-meeting-2

6. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख यांच्यासह उद्धव ठाकरे सायंकाळी हॉटेल अशोका येथे पोहोचले तेव्हा छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांचा एकच लखलखाट झाला.

nda-meeting-1

7. या बैठकीला एनडीएतील जुना घटक पक्ष असलेल्या अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल आणि हरसिम्रत कौर उपस्थित होत्या

nda-meeting-6

8. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही या बैठकीला उपस्थित होते

nda-meeting-8

9. अण्णा द्रमुकचे नेते व तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम हे या बैठकीला हजर होते

nda-meeting-5

10. लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामविलास पासवान,रिपाइंचे रामदास आठवले, अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांच्यासह आसाम गण परिषद, डीएमडीकेचे नेतेही बैठकीला उपस्थित होते

nda-meeting-11

 

आपली प्रतिक्रिया द्या