ओवेसी, सगळे मुसलमान तुझ्या बापाचे नोकर नाहीत; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

फोटो - चंद्रकांत पालकर

सामना ऑनलाईन । सातारा

शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सातारा येथे महासभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –

 • देशप्रेमाला जागा आणि या भगव्याचा शिलेदार दिल्लीत पाठवा – उद्धव ठाकरे
 • प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा देशावर संकट येतं, तेव्हा हा शिवप्रभुंचा महाराष्ट्र धाऊन जातो हा इतिहास आहे, ही आमची परंपरा आहे – उद्धव ठाकरे

 • ओवेसीने आपल्याला धमकी दिली होती की आम्ही सगळे हिरवे रस्त्यावर येतो, पोलीस बाजूला ठेवा आणि आम्हाला 15 मिनिटे द्या. पहिले ओवेसीला सांगतो, सगळे मुसलमान हे काय तुझ्या बापाचे नोकर नाहीत; देशप्रेमी मुसलमान हे आमच्यासोबत सुद्धा आहेत – उद्धव ठाकरे
 • यशवंतरावांना असंच सोडून देणारे आणि फसवणारे शरद पवार हेच होते राष्ट्रवादीचे नेते – उद्धव ठाकरे
 • इथे वीरचं जन्माला आहे आहेत, पण त्यांची आठवण काढणारा सुद्धा वीरचं पाहिजे. मैदान सोडून पाळणारा सेनापती अजिबात उपयोगाचा नाही – उद्धव  ठाकरे
 • काही जणं जेम्स बॉण्डला आदर्श मानतात. सगळीकडे 007, आता 7 निघून जाणार आणि नुसते 00 चं राहणार आहेत – उद्धव ठाकरे
 • ज्याच्या रक्तामध्ये निष्ठा आहे, असा निष्ठावानचं शिवप्रभुंच्या साताऱ्याचं खासदार म्हणून तुमचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करू शकतो – उद्धव ठाकरे
 • मी नरेंद्र पाटील यांच्याकडे बघत होतो की ते कॉलर उडवतात की नाही, पण त्यांना काही करण्याची गरजच नाही कारण त्यांच्या मिशीचा पिळच मजबूत आहे – उद्धव ठाकरे
 • तुमचा हातामधील भगवा झेंडा नाही ती एक मशाल आहे. 
 • औरंगजेबाने संभाजी महाराजांना हाल हाल करुन मारले त्यांना मानणाऱ्या लोकांना खासदार म्हणून पाठवायचे?
 • पंधरा मिनिटे पोलीस बाजूला ठेवा आम्ही हिंदूंना पाहतो असा बोलणारा औवेसी पंतप्रधान म्हणून चालेल का?
 • विरोधकांनी एक नाव पंतप्रधान म्हणून ठरवावे.
 • जसे दिल्लीमध्ये नरेंद्र तसे साताऱ्यामध्ये ही नरेंद्र.
 • आमच ठरलंय जस कोल्हापूर करणार आहे तस तुम्ही ठरवा
 • मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून आणि तुम्ही अण्णासाहेबांचे पुत्र म्हणून आपल्याला पुढील कामे करायची आहेत. 
 • माथाडी कामगारांच्या जबाबदारीचे ओझे अण्णासाहेब पाटील यांनी घेतले  होते. आता हे ओझे नरेंद्र पाटील आपल्याला घ्यायचे आहे.
 • अण्णासाहेबांचे व्यंगचित्र नरेंद्र पाटील यांना भेट.
 • नरेंद्र पाटलांच्या रक्तातच वचनबद्धता आहे.
 • अण्णासाहेब हे काँग्रेसवाले नव्हते शब्दाला जागणारे होते म्हणून वचनबद्धतेला जागून त्यांनी स्वतः संपवून घेतले. 
 • अण्णासाहेब पाटील यांची घोषणा सर्वसामान्यांना जर मी न्याय देऊ शकलो नाही तर उद्याचा सूर्य मी पाहणार नाही.
 • अण्णासाहेब पाटील आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या ऋणानुबंध दर्शवणारे पुस्तक नरेंद्र पाटलांना भेट.
 • अठरापगड जाती आणि बहुजन समाज एकत्र करण्याचे काम शिवरायांनी केले. 
 • सर्वसामान्य माणसाला मधील असामान्यत्वाची जाणीव शिवरायांनी करून दिली.
 • यशवंतरावांना फसवणारा नेता शरद पवार.
 • संपूर्ण देशामध्ये जेव्हा हिरवा होता तेव्हा महाराष्ट्रामधील भगवा देशाच्या संरक्षणासाठी उभा होता.
 • वीरांची आठवण काढण्यासाठी वीरच हवा, पळून जाणारा सेनापती नको. ही वीरांची भूमी आहे.
 • साताऱ्याची भूमी ही धगधगत रण
 • शिवरायांपासून सातारा हा भगव्याचा बालेकिल्ला आहे.
 • सातारा हा आपला बालेकिल्ला झाला पाहिजे.
 • या वेळेला आपल्याला साताऱ्यामध्ये शिवरायांचा भगवा फडकवायचा आहे.
 • जनतेचे प्रश्न जाणणारा खासदार दिल्लीत गेला पाहिजे.
 • काहीजण छत्रपती शिवरायांना आदर्श मानतात आणि काहीजण जेम्स बॉण्ड ला आपला आदर्श मानतात. शून्य शून्य बाकी काही नाही.
 • नरेंद्र पाटील यांना कॉलर उडवण्याची गरज नाही. 
 • आज प्रचाराचा दिवस संपतोय आणि उद्या विजयाचा दिवस सुरू होतोय.
आपली प्रतिक्रिया द्या