पश्चिम रेल्वे स्थानीय लोकाधिकार समिती कार्यकारिणी जाहीर

सामना प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या संमतीने पश्चिम रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी रमेश गवळी तर सरचिटणीसपदी अरुणकुमार दुबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार्याध्यक्षपदी राजू पाटणकर, भरत मेर, संपत नडे, गोपाळ खाड्ये, उपाध्यक्ष – मनोहर कापडोसकर, सुनील मयेकर, रमाकांत दळवी, अप्पा सावंत, प्रदीप तानावडे, राजेंद्र चव्हाण, हेमंत राणे, उत्तम धुरी, सहसरचिटणीस – कृष्णा मुळीक, मनोज सत्यम, सतीश परब, खजिनदार – मनोज सत्यम, सहखजिनदार – संजय मयेकर, चिटणीस – प्रसाद सावंत, कैलास लाड, दिनेश परब, बाळकृष्ण सरफरे, राकेश कांबळी, जितेंद्र भगत, सुनील पाटील, अमोल चौधरी, दीपक सावंत, मनोहर कदम, विजय भोसले आणि कायदेविषयक सल्लागारपदी आय. एस. राव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महासंघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.