मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारला धोका, मुख्यमंत्रीपदी पुन्हा शिवराज सिंह चौहानांची वर्णी ?

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशात कमल नाथ सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजपने केला आहे. तसेच राज्यपालांना पत्र पाठवून कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याची मागणी केल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. मध्य प्रदेशात बसपा आणि अपक्षांच्या बळावर तरलेले कमलनाथ सरकार पडून भाजपचे सरकार आल्यास मुख्यमंत्रीपदी पुन्हा शिवराज सिंह चौहान यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात मध्यप्रदेशतही काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याने आता राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये कमलनाथ सरकार बहुमत सिद्ध करू न शकल्यास भाजप सत्तास्थापनेचा दावा करेल. तसेच मुख्यमंत्रीपदी पुन्हा शिवराज सिंह चौहान यांनाच संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या