मुंबईत शिवसेना भाजप युतीला 31 विधानसभा मतदारसंघात आघाडी

132

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळून दणदणीत विजय मिळाला आहे. तर मुंबईतील सहाही जागा जिंकून युतीने विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीत 36 पैकी तब्बल 31 विधानसभा मतदारसंघात युतीला आघाडी मिळाल्याचे समोर आले आहे.

मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघापैकी केवळ 5 विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाला आघाडी मिळाली आहे. त्यापैकी ईशान्य मुंबईतील मानखुर्द मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी मिळाली आहे, तर इतर पाच मतदारसंघात भाजपच्या मनोज कोटक यांना आघाडी मिळाली आहे.  दक्षिण मध्य मुंबईत फक्त धारावीत काँग्रेसला आघाडी मिळाली आहे इतर पाच ठिकाणी शिवसेनेला आघाडी मिळाली आहे. दक्षिण मुंबईत मुंबादेवी आणि भायखळ्यात काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना आघाडी मिळाली आहे इतर चार मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना आघाडी मिळाली आहे.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील केवळ वांद्रे विधासभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना आघाडी मिळाली आहे. तर इतर पाच विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन यांना आघाडी मिळाली आहे. उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी आणि मुंबईच्या उत्तर पश्चिममधील शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यांना सर्व मतदारसंघातून आघाडी मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या