छिंदमचे नगरसेवक पद रद्द करा, शिवसेनेच्या नगरसेवकाचं महापौरांना पत्र

सामना ऑनलाईन । नगर

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढणाऱ्या श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. नगरच्या महापौरांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे.

उपमहापौर श्रीपाद छिंदम याने केलेला अपमान हा हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून या वक्तव्यामुळे संपूर्ण देशात नगर जिल्ह्याची बदनामी होत आहे. त्यामुळे श्रीपाद छिंदम याचं नगरसेवक त्वरीत रद्द करावं अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. हा विषय तातडीने महासभेपुढे घेण्यात यावा असंही या नगरसेवकांचं म्हणणं आहे. यात, सभागृह नेता उमेश खंडेराव कवडे, स्थायी समितीतचे सभापती सचिन जाधव यांच्यासह आठ नगरसेवकांचा समावशे आहे.

दरम्यान, श्रीपाद छिंदम यांचा उपमहापौर पदाचा राजीनाम महापौर सुरेखा कदम यांनी मंजूर केला आहे. तर, श्रीपाद छिंदम यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्तांकडून मंजूर करण्यासाठी शिवसेनेसह अन्य पदाधिकाऱ्यांची आयुक्तांच्या दालनात चर्चा सुरू झाली आहे