खरीप पिकाच्या नुकसानीचे अनुदान तत्काळ देण्याची मागणी


सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे परळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकाच्या नुकसान भरपाईचे अनुदान तात्काळ वाटप करा अन्यथा शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करून अनेक दिवस झाले असून आजवर कुठल्याही प्रकारची मदत शेकऱ्यापर्यंत पोहचली नसून प्रशासनाच्या वतीने या विषयी पाठपुरावा करण्यास दिरंगाई दिसून येत आहे. खरीपाच्या नुकसानीचे अनुदान वाटप करत असताना कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी अनुदानाची आलेली रक्कम कर्ज खात्यात न घेता त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांनाच व्हावा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना वेठीस धरू नये अशा सूचना प्रशासनाने संबंधित बँकांना द्याव्यात आणि दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना अंशतः दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.