पूजा कुऱ्हेच्या मृत्युला कारणीभूत अधिकाऱ्यांवर कारवाई करा, शिवसेनेची मागणी

shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी, नगर

महावितरणाच्या गलथान कारभारामुळे पूजा कुऱ्हे तिचा जीव गेला याला कारणीभूत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी व त्याला निलंबित करावे या मागणीसाठी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आज महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे इशारा दिला आहे तसेच अचानक आलेल्या पावसाने महावितरणची त्रेधा उडाली आहे अधिकारी नागरिकांना उत्तर देत नाहीत किंवा फोन बाजूला काढून ठेवण्याचे प्रकार घडतात त्याला जबाबदार अधिकारी चाहे आपल्याला कारभार सुधारायचा की नाही जर कारभार सुधारणार नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही उपनेते राठोड यांनी यावेळी दिला

काल पोलीस हेड कॉटर मधील पूजा कुरे हिचा शॉक बसून मृत्यू झाला होता, महावितरणाला चार दिवसापूर्वी तिच्या वडिलांनी लेखी तक्रार देऊनही याची दखल घेतली नाही. काल पूजा हिला शॉक बसून तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर महावितरणच्या कारभारावर सर्वांनी नाराजी व्यक्त केली. आज शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने महावितरण कार्यालयावर मोर्चा नेला होता, जय भवानी, जय शिवाजी च्या जोरदार घोषणा देत हा परिसर दुमदुमून टाकला होता. महावितरणाचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा देत शिवसैनिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा नेला.

महावितरणचे अधीक्षक अभियंता सांगळे यांच्याशी चर्चा करताना शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी कुरे यांनी महावितरणकडे लेखी तक्रार देऊन त्यांच्या घराच्या विद्युत पुरवठा बाबत तक्रार दिली असताना संबंधित अधिकाऱ्याने याकडे दुर्लक्ष केले वास्तविक पाहता त्याच वेळेला त्यांचा प्रश्न मार्गी लागला असता तर पूजाला आपला जीव गमवावा लागला नसता याला जबाबदार आपले अधिकारी आहेत. त्यामुळे संबंधिताची तात्काळ चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने राठोड यांनी अधीक्षकांकडे केली.

नगर शहरामध्ये सध्या महावितरणाचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे पावसाळ्याच्या तोंडावर सर्वत्र दाणादाण उडाली आहे. आज 24-24 तास अनेक भागांमध्ये वीज पुरवठा नाही. वास्तविक पाहता आपत्ती व्यवस्थापनाच्या जो भाग आहे तो आपण अमलात आणला नाही यावरून आता दिसून आले आहे .वास्तविक पाहता आपल्याकडे स्वतंत्र यंत्रणा पाहिजे होती ते कुठेही दिसून आले नाही. अनेक झाडांच्या फांद्या अजूनही काढलेल्या नाहीत त्यामुळेच आणि घटना घडल्या आहेत वास्तविक पाहता आपण महानगरपालिकेकडे मागणी करण्यापेक्षा आपल्या सक्षम यंत्रणा उभारली गेली पाहिजे, यासाठी नियोजन केले पाहिजे. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर आपली कोणतीच यंत्रणा कार्यरत झाली नाही, यासारखे दुर्दैव नाही. आज जनता आपल्याकडे बिल भरते जर बिल भरले नाही तर त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जातो या कामांमध्ये आपला अतिशय तत्परता दाखवतात मात्र ज्या वेळेला जनता आपल्याकडे तक्रार घेऊन येते त्याची तक्रारीची दखल घेतली जात नाही ही बाब अतिशय गंभीर आहे. अधिकारीवर्ग असतात त्यांनी प्रत्यक्षात बाहेर फिरले पाहिजे जी परिस्थिती आहे ती समजून घेतली पाहिजे मात्र असे कुठेही होताना दिसत नाही. आजही सावेडी तसेच शहरातील अनेक भागांमध्ये 24 तास वीज पुरवठा खंडित झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. एक प्रकारे पावसाळ्यापूर्वी ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या महावितरणने केला नाही असा आरोपही यावेळी राठोड यांनी केला अनेक भागांमध्ये आजही समस्या आहेत तक्रारी आहेत त्याची दखल पण घेतली जात नाही उडवाउडवीचे उत्तर देऊन नागरिकांची दिशाभूल केली जाते ही बाब गंभीर आहे. जर आपण याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल व त्याला जबाबदार प्रशासनच राहील असा इशाराही राठोड यांनी यावेळी दिला.

यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी शहरांमध्ये पावसाळ्यापूर्वी आपण काय उपयोजना केला हे सांगितले पाहिजे .यंत्रणा म्हणावे अशी कार्यान्वित तुमची झाली नाही अनेक भागांमध्ये कामे अजूनही प्रलंबित आहे .अधिकारी त्याची दखल सुद्धा घेत नाही त्यामुळे एक प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी शहरांमध्ये अनेक भागांमध्ये अशी परिस्थिती आहे की जिथे दिवस दिवस वीज नाही किंवा नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही साधे फोन सुद्धा उचलला जात नाही आणि अधिकाऱ्यांचे फोन बंद असतात ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अधीक्षक अभियंता सांगळे यांनी पोलीस हेडक्वॉटर मध्ये घडलेल्या प्रकाराचा संदर्भामध्ये आमच्याकडे सुद्धा माहिती आलेली आहे. तसेच या प्रकरणासंदर्भात मध्ये चौकशी अधिकारी सुद्धा नेमलेले आहेत त्यांचा चौकशी अहवाल आल्यानंतर निश्चितपणे कारवाई केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनाला शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम ,दत्तात्रेय कावरे, संतोष गेनाप्पा, सचिन शिंदे, संजय शेंडगे, सुरेश तिवारी, संतोष हरबा, राम नलकांडे,अर्जुन बोरुडे, दत्ता जाधव, गिरीश जाधव ,प्रशांत गायकवाड , जयंत येलूलकर , विशाल वालकर, अक्षय कातोरे, परेश लोखंडे पारू नाथ ढोकळे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या