ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विजयानंतर औशात साखर वाटून जल्लोष

110

सामना प्रतिनिधी । औसा

धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीत शिवसेना – भाजप – रिपाई – रासप महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विजयाची घोषणा होताच औसा शहर परिसरात फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली.

२४ मे रोजी औसा टी पॉईंटच्या शिवसेना कार्यालयासमोर साखर वाटप आणि त्यासोबतच फटाक्याची अतिषबाजीही करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने, भाजपाचे माजी आमदार पाशा पटेल, तालुका प्रमुख सतिश शिंदे, माजी तालुका प्रमुख संजय उजळंबे, शहराध्यक्ष सुरेश भुरे, अ‍ॅड. मुक्तेश्वर वागदरे, सुशिल बाजपेयी, भिमाशंकर राचट्टे, संतोष मुक्ता, प्रविण कोपरकर, अनंत जगताप, बंडू कोद्रे, गोविंद खंडागळे, विनोद माने, शिवा गायकवाड, अमोल सूर्यवंशी, सुनिल भुरे, व्यंकट माने, जगदीश शेट्टे , संतोष चिकुर्डेकर यांच्यासह शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या