एकवीरा देवीच्या मंदिरावर पुन्हा सोनेरी कळस झळकला

सामना ऑनलाईन । पुणे

महाराष्ट्रातील कोटय़वधी भाविकांचे श्रद्धास्थान आणि असंख्य कुटुंबांची कुलदेवता असलेल्या कार्ला गडावरील एकवीरा देवीच्या मंदिरावर बुधवारी  सोनेरी कळस पुन्हा एकदा झळकला. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी मध्यरात्री या मंदिरावरील कळस चोरीला गेला होता. या घटनेची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार खासदार श्रीरंग बारणे यांनी पंचधातूचा सोन्याचा मुलामा असलेला नवीन कळस बनवून घेतला. शिवसेनेच्या वतीने हा कळस श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टला मंगळवारी अर्पण करण्यात आला होता. त्याची विधिवत पूजा करून आई एकवीरेच्या मंदिरावर पुन्हा कलशारोहण करण्यात आले. त्यामुळे भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.