चंद्रपूरचे शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख रमेश तिवारी यांचे निधन

8

सामना प्रतिनिधी । नागपूर

चंद्रपूर शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक, सहसंपर्क प्रमुख रमेश तिवारी यांचे नागपूरच्या खाजगी रुग्णालयात निधन झाले, त्यांचं वय 47  होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांना नागपूर मध्ये भरती करण्यात आलं होतं. गळ्यात गाठ आली असताना त्यांना त्याचा त्रास जाणवू लागला. परंतु त्यांनी कामाच्या दगदगीत चंद्रपूरमध्येच उपचार करण्यास सुरुवात केली, काही दिवसांपूर्वी मुंबई जात असताना त्यांना वाटेतच त्रास सुरू झाला व लगेच त्यांना नागपूर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ताबडतोब उपचार करण्यास सुरुवात केली, गाठेची तपासणी करण्यात आली त्यात त्यांना कर्करोग झाला असे आढळले.

2 दिवसांपूर्वी फुफ्फुसांनी काम करणे बंद केले, तिवारी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज त्यांचं नागपूरमध्ये निधन झालं. ही दुःखद वार्ता शहरात पोहचताच शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरली. जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवण्यास त्यांचा सिंहाचा वाटा होता, त्यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.

रमेश तिवारी गेली 30 वर्ष शिवसेनेत काम करत होते, त्यांनी शिवसेनेत किसान सेना उपजिल्हा प्रमुख, उप शहर प्रमुख, उप जिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, नंतर जिल्हा सह संपर्क प्रमुख पदावर काम केले होते.