बीड जिल्ह्यात भगवे वादळ निर्माण करणार – चंद्रकांत खैरे

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्ह्यात शिवसेना पक्षसंघटनवाढ, विस्तार व आगामी निवडणूक मोर्चेबांधणीसाठी रिक्त पदांच्या पदाधिकारी निवडीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून, शिवसेना नेते तथा संपर्कप्रमुख खासदार चंद्रकांत खैरेंच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. बीड, गेवराई, आष्टी या तिन्ही ठिकाणी चंद्रकांत खैरे व राज्य संघटक गोविंद घोळवे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. बीड येथे झालेल्या आढावा बैठकीत खैरे यांनी सर्वांनी एकदिलाने कामाला लागत तिन्ही विधानसभेवर भगवा फडकावा असा आदेश उपस्थित शिवसैनिकांना दिला.

बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघात आढावा बैठकांचे आयोजन काल दिवसभर टप्प्याटप्प्याने करण्यात आले होते. बीड येथे हॉटेल साई पॅलेस येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत बोलतांना शिवसेना संपर्कनेते तथा संपर्कप्रमुख खैरे यांनी बीड विधानसभेत माजी आ. सुनील धांडे, प्रा. नवले सारख्या सर्वसामान्य लोकांना शिवसैनिकांनी आमदार केल्याची आठवण करून दिली.

माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी शिवसेनेत कसलेही गटतट नसून शिवसैनिक एकदिलाने मातोश्रीचा आदेश मानतील असा निर्वाळा देत शिवसेना एकजूट असल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी ‘जो शिवसेनेत काम करेल त्यालाच संधी मिळेल’ असे सांगितले. यावेळी त्यांनी बीड विधानसभेत 100 शाखांसह शिवसेना शहरातदेखील आगामी काळात विस्तार करणार असल्याचे सांगितले.

यावेळी राज्य संघटक गोविंदराव घोळवे, महिला आघाडी संपर्कप्रमुख संपदाताई गडकरी, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत नवले, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे, नारायण काशीद, संजय महाद्वार, भारत जगताप, जिल्हा संघटक बप्पासाहेब घुगे, तालुकाप्रमुख उल्हास गिराम, भरत जाधव, अजय दाभाडे, जालिंदर वांढरे, राहुल चौरे, सभापती युद्धाजीत पंडित, शहरप्रमुख सुदर्शन धांडे, अनिल सुरवसे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर बहिर, माजी उपजिल्हाप्रमुख जयसिंग चुंगडे, गणेश वरेकर, उपसभापती मकरंद उबाळे, युवानेते नितीन धांडे, पंस सदस्य गुंडिबा नवले, नगरसेवक संजय उढाण, लक्ष्मण इटकर, माजी पंस सदस्य नवनाथ प्रभाळे, सरपंच हनुमान जगताप, सुशील पिंगळे, अभिजित बरीदे, प्रा. रणजित आखाडे, गिरख सिंघण, रतन गुजर, शिनूभाऊ बेदरे, रोहित पंडित, महिला आघाडीच्या अलकाताई डावकर, ऍड उज्वला भोपळे, चंद्रकला बांगर, संगीत चव्हाण, लता राऊत, गणेश उगले, गणेश कोळेकर, शेखर शिंदे, अविनाश पुजारी, राहुल साळुंखे, शिवराज बांगर, साहिल देशमुख, संदीपान बडगे, आश्रम आमटे, संग्राम गव्हाणे, राहुल फरताडे, सुरज चुंगडे, कल्याण जाणवळे, सुनील सुरवसे, आदींसह तिन्ही विधानसभा क्षेत्रातील उपतालुकाप्रमुख, सर्कलप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, सलग्न संघटनांचे आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची उपस्थिती या आढावा बैठकांना होती.