शिवसेनेचा शनिवारी नेरुळमध्ये मेळावा


सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

नेरुळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक केंद्रात येत्या ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघातील शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

पक्षांतर्गत बांधणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, रवींद्र वायकर, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या माध्यमातून शहरात सामाजिक उपक्रमांचा सपाटा लावण्यात आले असतानाच पार पडत असलेल्या या शनिवारच्या मेळाव्याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. शहरात सुरू झालेला शिवसेनेचा भगवा झंझावत पाहून विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.